Home latest News समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे व रमेशराव डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त...

समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे व रमेशराव डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त वही व पेनचा वाटप

95

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

वर्धा :स्थानिक सिंदी(मेघे)जय भिम बुद्ध विहार येथे समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिकजी गाडगे व रमेशरावजी डांगे यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही व पेनचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन पुंडलिकजी गाडगे व रमेशरावजी डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भन्ते कारुनिक यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली.यावेळी उपस्थितांना अल्पापोहार देण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे ,जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, भन्ते कारुनिक, मारोतराव डंभारे पहेलवान,सारंग ढोबळे,शंकेश पाटील,प्रदीप धोंगडे, पंकज कांबळे,वेदांत चव्हाण,श्याम बेंडे,शिवम जाधव,सेवक लोहवे आदी मान्यवर व विद्यार्थी बहसंख्येने उपस्थित होते.