महाड वनविभागाच्या आशीर्वादाने कोळशाचा काळाबाजार "रात्रीस खेळ चाले" वनअधिकारी निद्रा अवस्थेत

महाड वनविभागाच्या आशीर्वादाने कोळशाचा काळाबाजार “रात्रीस खेळ चाले” वनअधिकारी निद्रा अवस्थेत

महाड वनविभागाच्या आशीर्वादाने कोळशाचा काळाबाजार "रात्रीस खेळ चाले" वनअधिकारी निद्रा अवस्थेत

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड तालुका दुर्गम डोंगराळ भाग जास्त प्रमाणात असल्याने अवैधरित्या जंगलतोड करून कोळसा भट्टी लावण्याचे प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहेत महाड तालुक्यामध्ये गेली अनेक वर्षांपासून अवैधरित्या कोळसा विक्री होत असून रात्रीच्या सुमारास अनधिकृत वाहतूक करुन कोळसा संबंधित हाॅटेल, लाॅन्ड्री, विटभट्टी याठिकाणी टाकला जातो व दिवसाढवळ्या खुलेआम वापर केला जातो परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नसावे कारण “मियां बिबी राजी तो क्या करेगा पाजी” अशा प्रकारचे संबंध असल्याची दाट शक्यता निर्माण होत आहे कोणत्याही प्रकारची कारवाई नाही त्यामुळे कोळसा व्यापारी बिनधास्त “रात्रीस खेळ चाले” करण्यासाठी जुमानत नाहीत “तेरी भी चूप और मेरी भी चूप” या हितसंबंधामुळे अवैधरित्या वृक्षतोड करून कोळसा भट्टी लावण्याचे काम चालू आहे त्यामुळे कोळशाच्या काळाबाजारात वाढ होताना दिसत असून वनविभागाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here