ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर पडद्याआड.
भागवत जाधव
८८०५०२२५६५
अलिबाग
अलिबाग: गंगाराम गवाणकर हे मराठी आणि विशेषतः मालवणी बोलीभाषेतील एक अग्रगण्य लेखक, नाटककार म्हणून ओळखले जात होते मालवणी भाषेला मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांची सर्वात मोठे योगदान आहे
जीवन परिचय आणि संघर्ष: यांचा जन्म १ जून १९३९ झाला यांचे निधन २७ ऑक्टोबर २०२५ वयाच्या ८६ व्या वर्षी झाला मुंबईत त्यांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस स्मशानाच्या जवळ काढल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आत्मकथनात केला आहे कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी एमटीएनएल मध्ये नोकरी केली सोबतच नाट्य लेखनाचा छंदही जोपासला.
मालवणी भाषेतील नाटकांना महाराष्ट्रात आणि जगभरात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना जाते ‘वस्त्रहरण’अजरामर कलाकृती होती वस्त्रहरण हे गंगाराम गव्हाणकर यांची सर्वात गाजलेले विक्रमी नाटक आहे या नाटकामुळे मालवणी भाषेला व्यवसायिक रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणले या नाटकाचे ५४०० हून अधिक प्रयोग झाले जो मराठी रंगभूमीवरील एक मोठा विक्रम आहे. या नाटकाचे प्रयोग दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंग महोत्सवात आणि लंडनमध्येही झाले होते या नाटकाला सुरुवातीला काही विरोध झाला परंतु पूल देशपांडे यांनी या कलाकृतीला खंबीरपणे पाठिंबा दिला.
गव्हाणकर यांनी सुमारे २० अधिक नाटके लिहिली त्यापैकी वात्रट मेले या नाटकाचेही २००० अधिक प्रयोग झाले. वन रूम किचन या नाटका नाही प्रेक्षकांना भरपूर पाठिंबा दिला या नाटकाचेही १००० अधिक प्रयोग झाले होते. त्यांची इतर गाजलेली नाटके ‘दोघी’ वरपरीक्षा ‘वरभेटू नका’ ‘उषःकाल होता होता’. वस्त्रहरणाच्या परदेशातील प्रयोगावर आधारित त्यांचे आत्मचरित्रपर लेखन व्हाया वस्त्रहरण हे वाचकांच्या पसंतीस उतरले त्यांनी १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला “जागर” या मराठी चित्रपटासाठी संवाद लेखनही केले होते. त्यांच्या दीर्घ साहित्यिक कारकिर्दीबद्दल त्यांना मानाची संघटना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
गंगाराम गवाणकर हे स्थानिक व्यक्तिरेखा आणि खुसखुशीत उपरोधिक विनोद यांचा सुरेख संगम होता ज्यामुळे ते मराठी रंगभूमीवर “वस्त्रहरणकार” म्हणून कायम स्मरणात राहतील.(वरील संकलन सर्च करून घेतले आहे)









