स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, राज्यभरातील भाविकांची फौज प्रचार कार्यात उतरणार
ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीत श्री श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार आहेत. तसेच सात मतदार संघातही सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवार प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली. कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु वैचारिक पक्षासोबत आम्ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती विष्णू महाराज म्हणाले. बाबाजींना निवडून आणण्यासाठी राज्यातील भाविकांची फौज प्रचार कार्यात उतरणार आहे. तसेच प्रचारा दरम्यान भाविक प्रचार करण्यासाठी नाशिकला दाखल होणार आहे. बाबाजींनी देखील भक्त परिवाराच्या आग्रहाखातर व काळाची गरज म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव, जालना, दिंडोरी, अहिल्यानगर आदी सात लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती विष्णू महाराज यांनी दिली. बाबांची उमेदवारी ही राजकारणाला कलाटनी देणारी आहे कारण एक मंत्री दरवर्षी जे काम करू शकत नाही असे दर्जेदार समाज हिताचे धर्म हिताचे देश हिताचे कार्य महामंडळेश्वर शांतिगिरी महाराज दरवर्षी कुठलीही सत्ता अथवा पद नसताना करत असतात. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक ह्या दृष्टीने बालसंस्कार व्यसनमुक्त समाज व महिला सक्षमीकरण यासाठी भरीव कार्य सुरू आहे. सत्तेचं बळ मिळाल्यास महाराज अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवतील असा विश्वास विष्णू महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.