कार आणि बसच्या धडकेत बस मधिल 9 प्रवासी झाले जखमी..

कार आणि बसच्या धडकेत बस मधिल 9 प्रवासी झाले जखमी..

त्रिशा राऊत नागपुर जिला ग्रामीण प्रतिनिधि
मो 9096817953

नागपुर:भरधाव कार चालकाने टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या नादात जबर धडक दिल्यावर कार रस्त्यावर आडवी झाली. तेव्हाच दोन एसटी बस एका पाठोपाठ येत होत्या. कार एसटीला धडकणार तोच एसटी चालकाने जोरात ब्रेक लावला.यात दोन बसगाड्या एकामागून एक धडकल्या. या विचित्र अपघातात दोन्ही बसमधील ९ प्रवासी जखमी झाले. एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.

जखमींना मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी तलावा जवळील सर्व्हिस रोडवर मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली. छिंदवाडा येथून भंडारा आगाराची (एमएच-४० वाय- ५५५८) क्रमांकाची बस नागपूरमार्गे गोंदियाला जात होती.
बसचालक शंकर राऊत व वाहक उज्जव पराते प्रवाशांसह कोराडी तलावाजवळील सर्व्हिस रोडवरून जात होते. या बसच्या मागे रामटेक आगाराची (एमएच-२० बीएल-४२०१) क्रमांकाची आवडेघाट-नागपूर बस होती. सर्व्हिस रोडने एक टीप्पर मुख्य रस्त्याच्या दिशेने येत होता. त्याचवेळी (एमएच-४० सीएच २३८६) क्रमांकाच्या कारने भरधाव कार एसटीवर धडकली ओव्हरटेक करण्याचा नादात थेट टिप्परला धडकली.
त्यामुळे कार रस्त्यावर आडवी होऊन एसटीवर आदळली. कार अचानक पुढे आल्यामुळे बस चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक मारला. या बसच्या मागे रामटेक आगाराची एसटी होती. ब्रेक लावल्याने दोन्ही एसटी एकामागून एक धडकल्या. या विचित्र अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले. यात ९ प्रवासी जखमी झाले. आवडेघाट-नागपूर बसच चालक अनिल वाघमारे जखमी झाले. सर्व जखमींना त्वरित मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे नियंत्रक विनोद चवरे, सहायक वाहतूक अधीक्षक राकेश रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. या अपघातात कार आणि टीप्परमधील कोणीही जखमी झाले नाही. कार चालकाची चूक असल्याचे सांगण्यात येते. या विचित्र अपघाताबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टिप्पर की कार चालक यात नेमकी चूक कुणाची याचा तपास कोराडी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here