तिकीट मागितल्याने प्रवाशांनी कंडक्टर वर केला चाकूचा हल्ला.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपूर: एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ही टॅगलाईन चालव महामंडळाने प्रवाशांचा विश्वास जिंकला आहे. राज्यात कोट्यावधी प्रवासी बसचा प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र , नागपूर मधील एका घटनेने बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरहून संभाजीनगरला जाणाऱ्या बस मधील एका प्रवाशाला तिकिटांच्या रकमेची मागणी केल्याने प्रवाशांनी बस वाहकाशी वाद घातला थेट चाकूने हल्ला केला. या घटनेने चांगलाच गोंधळ उडाला , हसून प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. अखेर, आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. संभाजीनगर आगाराची नागपूर संभाजीनगर एम एच 14 सी .यु.4958 ही बस नागपूर येथून संभाजीनगर साठी निघाली होती. बस वाहक योगेश काळे यांनी नागपूर ते कोंढाळी दरम्यान प्रवास करणाऱ्या फिरोज शेख यास तिकिटाची रक्कम मागितली. संबंधित प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट असल्याची माहिती दिली. त्यावेळी, वाहकाने मोबाईलवर आलेला मेसेज दाखवण्याची मागणी प्रवासी फिरोज कडे केली. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रवासी फिरोज शेकणे योगेश काळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून प्रवाशाने बस कंडक्टरवर चाकूचा हल्ला केल्याची घटना घडली. सदर बस कोंडाळी नजदीकच्या रिंगणाबोडी गावाजवळ पोहोचली. तरीही फिरोजनी बस कंडक्टरला ना तिकीट दाखवले ना तिकिटांची रक्कम देऊन दुसरे तिकीट घेतले. त्यामुळे, वाहक योगेश काळे यांनी फिरोज कडे तिकिटाची रक्कम मागितली. त्यामुळे संताप व्यक्त करत आरोपी फिरोजने आपल्या जवळ असलेला चाकू काढून वाहकांच्या डोक्यावर हल्ला केला योगेश काळे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही प्रवाशांनी हिम्मत दाखवत फिरोजला पकडले, दुसऱ्या एका प्रवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली दरम्यान आरोपी फिरोज यांना मोबाईल फोन आणि चाकू चालत्या बसमधून फेकून दिला. त्यावेळी , बस चालक संतोष मच्छिंद्र जाधव यांनी प्रसंगावधानता दाखवत बस कोंडाळी पोलीस ठाण्यात आणली. कोंडाळी पोलिसांनी योगेश खाडे यांना उपचारासाठी कोंडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले व आरोपी फिरोज शेख याला अटक करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र , या घटनेमुळे प्रवांशामध्ये भीती पसरली होती.तर बसमधील वाहक चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचे प्रश्न समोर आला आहे.