Home latest News अवैध संबंधित तंबाखूसाठा जप्त

अवैध संबंधित तंबाखूसाठा जप्त

96

अवैध संबंधित तंबाखूसाठा जप्त

अवैध संबंधित तंबाखूसाठा जप्त

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

उमरेड.:- प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या साठवणूक करणाऱ्या व नागपूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात 26 एप्रिल शुक्रवारला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद तुकाराम मोहोतकर कळमना तालुका उमरेड असे आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून 60,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात 328,262,263,188, भांदवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक रमेश यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे , प्रदीप चौरे , बालाजी साखरे , विष्णू जायभाई, पंकज बट्टे ,यांनी ही कारवाई पार पाडली.