रिझर्व्ह बँक लवकरच आणनार 100 रुपयांची नवीन नोट.

✒️प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒️
नवी दिल्ली,दि.29 मे:- लवकरच तुमच्या खिशामध्ये 100 रुपयांची झगमगती नविन नोट दिसण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100 रुपयांच्या वॉर्निक लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय़ अशा एक अब्ज नोटा छापणार आहे.
नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर हळूहळू वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील. अशी माहिती समोर येत आहे.








