कळमेश्वर ब्राह्मणी फाट्यावर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/कळमेश्वर:- येथील ब्राह्मणी फाट्यावर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दिनांक 29 मे ला सकाळी 11 वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यात त्यांनी शेतकऱ्यांना जुना दरात पेक्षाही 50 टक्के कमी दराने रासायनिक खते व बी-बियाणे यांचे मुबलक उपलब्धता करून देणे व शेतकऱ्यांच्या नाशवंत भागातील विक्रीसाठी तसेच शेतीच्या निगडित वस्तू खरेदीसाठी शेतीची निगडीत दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी बहुजन मुक्ती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. त्याचप्रमाणे दुकाने दिवसभर सुरु ठेवण्यात यावी तसेच केंद्र सरकारच्या वतीने नवीन पीक विमा कर्ज वाटपाचे बँकांना आदेश द्यावे. बी-बियाणे, बियाणे व विक्री कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये चढ्या दराने खते व बियाणे करणाऱ्या व्यापाऱ्यावर व दुकानदारावर तात्काळ कारवाई करावी. केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्या विरोधात पारित कायदा काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने कळमेश्वर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ईश्वर खोरगडे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल बोडके, पुंडलिक बोरकर, सचिन गजभिये, सोनू भूतमांगे, अमित पारस्कर, आशिष चालखोर, भीमराव डाखोळे, खेरडे हे निवेदन देते वेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.