Home latest News माथेरान वाहतुकीचा सावळा गोंधळ :- फक्त एकच पोलीस वाहतूककर्मचारी

माथेरान वाहतुकीचा सावळा गोंधळ :- फक्त एकच पोलीस वाहतूककर्मचारी

71

माथेरान वाहतुकीचा सावळा गोंधळ :- फक्त एकच पोलीस वाहतूककर्मचारी

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

माथेरान ; दर शनिवार रविवारी माथेरान येथे मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची मोठया प्रमाणावर निसर्गाचे आनंद घेण्यासाठी गर्दी
करतात. काही जण स्वतःची वाहने आणतात नेरळ – दस्तुरी नाक्यावर पार्किंग
साठी जागा अपुरीच पडत असल्याने वाहतुकीची कोंडी वारंवार पहावयास मिळत आहे.

लवकरच यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी पर्यटकांमधून जात असून प्रशासन मात्र डोळेझाक करून आहे.

ग्रामस्थांनी स्वतःहून रस्त्यावर येऊन वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता.
आत्ता नवीन बाब समोर येत आहे कि प्रसासानाकडे एकच वाहतूक कर्मचारी आहे तो कुठे कुठे धावपळ करणार?
कर्मचारी यांच्यात वाढ होणायची आवशकता भासत आहे तेव्हाच वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल या कडे लक्ष देतील का व हा पश्न मार्गी लावतील का?