Home latest News वैनगंगा नदीपात्रात प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

वैनगंगा नदीपात्रात प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

76

प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला, वैनगंगा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळळ उडाली आहे.

शिवणी (देशपांडे) येथील नदीकाठावर विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. माहितीच्या आधारावर घटनास्थळ गाठून ठाणेदारांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे शक्य नाही. मृतदेह वैनगंगा नदीपासून ५० फूट अंतरावर आहे.

आठवडाभर पूरपरिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे यादृष्टीने पोलीस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये मृतदेह आढळल्याने घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहेत.