गौरी गणपती च्या अनुषंगाने वाहतुकीस अडथळा निर्माण न होवो यासाठी माणगांव पोलीसाची उत्तम कामगिरी

46

गौरी गणपती च्या अनुषंगाने वाहतुकीस अडथळा निर्माण न होवो यासाठी माणगांव पोलीसाची उत्तम कामगिरी

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: ८०८००९२३०१

माणगांव :- माणगांव नगर पंचायत च्या हद्दीत असणारे माणगांव बाजारपेठेत नाल्याचे मोठ मोठे खडे पडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची कोढी होत आहे तर नागरिकांस चालण्यास कसरत करावी लागत आहे.

या अनुषंगाला धरून माणगांव पोलीस स्टेशनं चे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील साहेब , तसेच माणगांव पोलीस स्टेशनं चे निखिल सुते, अनिल रिटे, संतोष सगरे, संजीव सुरवसे आणि माणगांव नगर पंचायत चे उप नगराध्यक्ष सचिन बोबले यांनी चेतक कंपनी चे कॉन्टॅक्टधार यांना घेऊन माणगांव बाजार पेठेतील ज्या ज्या ठिकाणी गटारचे मोठ मोठे खडे पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी गटारचे कामकाज करून गणपती येण्याच्या आत गटाराचा काम करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक धाराणा त्याच प्रमाणे नागरिकांना अडथळा निर्माण न होवो यासाठी पाऊल उचललेला आहे.