Home latest News भद्रावतीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याचा हल्ला

भद्रावतीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याचा हल्ला

73

भद्रावतीमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याचा हल्ला

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

भद्रावती, ता. २८: बिबट्याच्या हल्ल्यात एक तेरा महिन्यांची बालिका जखमी झाली. ही घटना मंगळवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास आयुध निर्माणी वसाहतीत घडली. विधीशा विनोद गायकवाड असे जखमी बालिकेचे नाव आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले. बिबट्याच्या हल्यात बालिका जखमी झाल्याची ही गेल्या दहा दिवसांतील दुसरी घटना आहे.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांच्या अगोदर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वसाहतीतील एक बालिका जखमी झाली. होती. त्यामुळे आयुध निर्माणी वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निर्माणी वसाहतीतील सेक्टर २ क्वार्टर नंबर २४ बी येथे विनोद गायकवाड राहतात.