Home विदर्भ तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालयावर नागरिकांची धडक

तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालयावर नागरिकांची धडक

67

तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालयावर नागरिकांची धडक

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

नागभीड, 28 ऑक्टोबर
तालुक्यातील आकापूर, गंगासागरहेटी परिसरात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच शेतकरी वासुदेव वेटे (58, रा. आकापूर) यांचा शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. त्यातच रविवारच्या रात्री आकापूर गावालगत वाघाने एका श्वानावर हल्ला करून जखमी केले. या पृष्ठभूमीवर नरभक्षी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी तळोधी बा. येथील शिवाजी चौकातून ते मुख्य मार्गाने वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.
या आंदोलनात ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था आणि शेतकरी संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडा, अन्यथा ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येणार्‍या कार्यालयावर जनआंदोलन उभारू असा इशारा वनविभागाला दिला. या आंदोलनात ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था आणि शेतकरी संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडा, अन्यथा ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येणार्‍या कार्यालयावर जनआंदोलन उभारू असा इशारा वनविभागाला दिला.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या परिसरात धानकापणीचा हंगाम सुरू असून, सावर्ला आकापूर मार्गावर दिवसाढवळया दर्शन होत असल्यामुळे आकापूर, गंगासागर हेटी, उश्राळमेंढा, सावर्ला व लखमापूर परीसरातील जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे शेतीतील कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर, माजी सभापती प्रणया गड्डमवार, नागभीड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, आकापूर सरपंच कुणाल गहाणे, गंगासागरहेटीचे माजी सरपंच दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार, खुशाल मदनकर, येनोली सरपंच अमोल बावनकर आणि राहुल मदनकर आदी उपस्थित होते.