बालासाहेब जाधवांच्या प्रचारारर्थ अजित पवारांची शहरात विराट सभा सभेचे रूप पाहून विरोधकांची वाढली चिंता…

77

शहराची अवस्था पाहून धारूर करांच्या सहनशीलतेला केला अजितदादानी सॅल्यूट!

शहरातील बहुसंख्य लाडक्या बहिणीसह तरुण जेष्ठ नागरिकांची सभेला मोठी गर्दी

धारूर: नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट )अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब जाधव व त्याच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार यांच्या प्रचार सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते या सभेला प्रथम अध्यक्ष पदाचे उमेदवार बालासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री याच्या सह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त करताना शहरातील प्रलबित समस्या पर्यटन पाणी प्रश्न रस्ते बाजारपेठ स्वछता ही सर्व कामे नव्याने करण्याची मागणी अर्थ मंत्री म्हणून व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मागणी केली या वेळी शहरातुन अजितदादा चे चाहते व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आ प्रकाश सोळुंके जयसिंह सोळुंके मा मंत्री नवाब मलिक राजाभाऊ मुंडे रमेश आडस्कर राजेशवर चव्हाण व शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीने सभेला विराट स्वरूप आले होते.

या सभेला संबोधित करताना मा अजितदादा पवार यांनी गावातून कार्यक्रमाच्या स्थळी येताना शहरातील रस्ता अस्वछता पाहून काय माणसं आहे तुम्ही असा सवाल धारूर कराना करत 15/15दिवस पाणी येत नाही तुम्ही आणि तुमच्या या सहनशीलतेला सैल्यूट करतो म्हणून सभेची सुरुवात केली आता हे शहराची अवस्था बदलायची असेल तर स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष पदाचा उमेदवार बालासाहेब जाधव व त्याच्या सोबत असणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या मग तुमच्या शहरातील पाणी प्रश्न या ऐत्यासिक शहरात असलेल्या किल्ल्याला पर्यटन स्थळ. माता अंबाचोडी देवी ला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी आम्ही मी प्रयत्न करेल या मूळे शहरातील बाजार पेठ सुधारेल रोजगार निर्मिती होईल तरुणांना माझ्या लाडक्या बहिणीच्या हाताला काम मिळेल हे सर्व कामे करताना काही अडचणी निर्माण झाल्यातर बालासाहेब माझ्याकडे येऊन मला सांगा आपण त्या सोडविण्यासाठी त्या तुन मार्ग काढू तुम्हाला शहरासाठी चागले निर्णय घ्यावे लागतील तुम्ही चांगले काम कराल यांची मला खात्री आहे या वेळी नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराची तर त्यानी पिरेड च घेतली तुम्हाला आम्ही तिकीट दिले आहे त्या मूळे रोज शहरातील रस्ते साफ करतात का कोणाच्या काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी काम करावे लागेल अशी तंबी ही त्यानी सर्व उमेदवारांना दिली मी तुम्हाला निधी देतो पण त्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे त्या कामावर माझे वयक्तिक लक्ष असेल काम कोणतीही असो ते दर्जेदार झाले पाहिजे हे सर्व कामे करताना आ प्रकाश दादा सोळुंके राजाभाऊ मुंडे रमेश आडस्कर या कामाकडे लक्ष देतील आम्ही सर्व स्वच्छ प्रतिमेचे सर्व समाजातील वेगवेगळ्या घटकातिल युवकांचा महिलेचा तरुणाचा जेष्ठ या सर्वांचा विचार करून निवडून लढविली जात आहे त्या मूळे सर्वांना हात जोडून विनंती करतो कि चांगल्या संस्कारात राहून नीट वागा सर्व अंतर्गत भेदभाव बाजूला ठेऊन एकत्र येऊन धारूर च्या प्रलबित कामाचा नवीन योजना आणण्यासाठी आपण काम करू त्या मुळे बालासाहेब जाधव एक राजकीय सामाजिक कामाचा वारसा असलेल्या उमेदवार व त्याच्या सर्व सहकार्याला आपले मतदान करून विजयी करून आपल्या शहराची झालेली दूर अवस्था व्यवस्थित करू मी तुमच्या सोबत आहे एक चांगले शहराचे मॉडेल तयार करून दाखवू असा विश्वास त्यानी या वेळी या विराट सभेत व्यक्त केला.