Home latest News क्षुलक कारणावरून एकाला चाकुने केले गंभीर जखमी मालेगांव येथील घटना

क्षुलक कारणावरून एकाला चाकुने केले गंभीर जखमी मालेगांव येथील घटना

93

क्षुलक कारणावरून एकाला चाकुने केले गंभीर जखमी
मालेगांव येथील घटना

क्षुलक कारणावरून एकाला चाकुने केले गंभीर जखमी मालेगांव येथील घटना

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगांव

येथील नागेश दत्ता कुटे या युवकाला दुसऱ्या दोघांनी क्षुल्लक कारणावरून चाकुने गंभीर जखमी केल्याची घटना २८ जुलै च्या रात्री साडे नऊ वाजताचे सुमारास घडली . जखमी ला वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .
नागेश कुटे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तो व त्याचा मित्र सोनु बळी हे नागरतास बायपास वरील कैथल धाब्यावरून जेऊन मोटार सायकलने घरी येत असतांना निरज चौधरी व मनोज लोहार यांनी त्यांची गाडी थांबवली . ” तु माझ्या मित्राकडे माझी बदनामी का केली ” असे म्हणुन ते दोघे माझ्या अंगावर आले . त्यातील एकाने फिर्यादीस पकडुन ठेवले तर दुसर्‍याने त्यांच्या जवळील चाकु काढुन फिर्यादी च्या पोटावर , मानेवर व हातावर चाकुने वार केले . तेंव्हा फिर्यादी चा मित्र सोनु बळी याने सोडवा सोडव केली . त्यानंतर ते दोघे घटना स्थळावरू पळुन गेले . त्या जखमी अवस्थेत नागेश कुटे याला सोनु बळी याने पोलीस स्टेशनला आणले . पोलीसांनी मालेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना पाठवले असता डॉक्टरांनी त्यास वाशीम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले . फिर्यादी वरून व वैद्यकिय अहवालावरून पोलीसांनी वरील दोघां विरुध्द कलम ३२६ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास कोकाटे हे करीत आहेत .✍