Home पालघर मुक्या जनावरांना चारा कोण देणार – कुणबी समाजाचा सरकारला निवेदन

मुक्या जनावरांना चारा कोण देणार – कुणबी समाजाचा सरकारला निवेदन

329

हाता तोंडाशी आलेला घास आज माती मोल झाला गुरांच्या वैरणीची धुळदशा

म्हसळा:संतोष उध्दरकर.

म्हसळा:कोकणात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे हाता तोंडाशी आलेला घास आज माती मोल झाला आहे. या विषयी कुणबी समाज म्हसळा यांच्या मार्फत तालुका उपाध्यक्ष दिलिप मांडवकर मुंबई अध्यक्ष महेंद्र टिंगरे सरचिटणिस राजाराम तिलटकर मुंबई सरचिटणिस राजू धाडवे यांचे शिष्ठमंडळ यांनी तहसिलदार सचिन खाडे यांना निवेदन दिले असुन या वेळी तालुका उपाध्यक्ष लहु तुरे’ गजानन शिंदे , अनिल टिंगरे ,गोपिनाथ सावंत , दिपेश जाधव , जयेश जाधव , दिनेश पाडावे , शंकर घोलप , मिलिंद मोरे ‘ सौ अर्पिता धोकटे ,म्हस्कर , जयवंत मोरे , अन्य कार्येकरते उपस्थित होते
शेती करणारा कुणबी समाज व त्यासोबत अठरापगाड जातीचा समाज हा शेती करत आहे परंतु निसर्गाच्या पुढे केलेले सगळे परिश्रम आज निष्फळ ठरले आहेत.
या भीषण काळात आपण मायबाप सरकार आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले परंतु ती नुकसान भरपाई केवळ तुटपुंजी म्हणजे ती भिकाऱ्याला भीक देखील होऊ शकत नाही अशी तुलना आम्हा शेतकऱ्यांची आपण राज्यकर्ते करत आहात.
या निवेदनाद्वारे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की जे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तेवढ्या रक्कमेचा मदतनिधी त्वरीत द्यावा तरच हा पोशिंदा जगेल नाहीतर उद्या शेतकरी आपल्याला बघायला देखील मिळणार नाही अशी अवस्था या परतीच्या पावसाने केली आहे .
महोदय आपणास कोकणकरांची वेदना कदाचित माहीत नसतील विदर्भ मराठवाडा या भागात तुम्ही शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करता या ना त्या परीने त्यांना मदत करता परंतु कोकणा ने काय, वाईट केले आपलं, एकदा मंत्री एकदा आमदार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरिता पवित्र बुद्धी निर्माण का झाली नाही ? ही देखील आम्हाला मोठी खंत आहे
आम्हास ठाऊक आहे की आपण शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या शंभर टक्के मदत निधी त्वरित उपलब्ध करून द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर असं मग हा कुणबी समाज या विषयी बहुजन समाज सोबत आपल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल हे देखील आपण विसरता कामा नये
त्यामुळे आपण शासनाला त्वरित आदेश देऊन कोकणवासीयांचे, शेतकऱ्यांचे दुःख आपण समजून घ्याल आणि शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाईची त्याला शंभर टक्के मदत मिळवून द्याल तसेच गुरे ढोरे यांच्यासाठी चा चार, वैराण यांचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजन केली पाहिजे. अशीच आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करीत आहोत.