Home latest News धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे जिल्हाधिकारी जलज...

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन

70

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता,
शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता,
शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन

नामदेव धनगर
मिडिया न्यूज वार्ता धुळे जिल्हा प्रतिनिधी मों.9623754549

धुळे, सविस्तर वृत अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.धुळे
जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याचीही पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.वेळ प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्फॉटीर्मर जवळ थांबू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.