समर्थच्या विद्यार्थ्यांचा सेवा कार्य

57

समर्थच्या विद्यार्थ्यांचा सेवा कार्य

समर्थच्या विद्यार्थ्यांचा सेवा कार्य

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी :-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर पत्र भेट परिवार नागपूर यांच्या द्वारे अजित सद्गुरुदास महाराज यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक जपणूक केली. अमित फसाटे, आदित्य सारवे, यश निर्वाण, प्रज्वल निंबारते, प्रणय पिंपळशेंडे, अविनाश ठवकर एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या कार्यामुळे महाविद्यालयात त्यांच्या सत्कार करण्यात आला. एनसीसीचे प्रमुख प्रा रामटेके एनएसएस चे प्रमुख प्रा धनंजय गिऱ्हेपूंजे यांनी या विद्यार्थ्याना समाज कार्यासाठी प्रेरित केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ दिगंबर कापसे, प्रा लालचंद मेश्राम, डॉ पर्वते, प्रा धनंजय गिऱ्हेपूंजे, लेफ्टनंट प्रा रामटेके, प्रा अजिंक्य भांडारकर उपस्थित होते