Home latest News आताही आहे माणसात माणुसकी प्रतेक्षात पाहायला मिळाली पिंपळगाव सडक येथे…

आताही आहे माणसात माणुसकी प्रतेक्षात पाहायला मिळाली पिंपळगाव सडक येथे…

76

आताही आहे माणसात माणुसकी प्रतेक्षात पाहायला मिळाली पिंपळगाव सडक येथे…

आताही आहे माणसात माणुसकी प्रतेक्षात पाहायला मिळाली पिंपळगाव सडक येथे...

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-तालुक्यातील पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र च्या जुन्या इमारतीत *डोंगरा* नावाची गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून पिंपळगाव येथेच वास्तव्य करणारी व त्याचे कोणीही नसलेली व्यक्ती मरण पावली
गेल्या काही दिवसापासून त्या व्यक्तीची प्रकृती चांगली नव्हती, त्याच्यावर औषध उपचार सुद्धा स्थानिक गावकरी मंडळींनी केले होते
ती व्यक्ती पिंपळगावचा एक घटक म्हणूनच वावरत होती कदाचित तीस वर्षांपूर्वी ती व्यक्ती ओरिसा राज्यातील असावी असे भाषेवरून लक्षात येते, ती मात्र पिंपळगाव येथे तेव्हापासूनच राहत होती त्या व्यक्तीला कोणताही लोभ नव्हता , कोणी दिलेत एवढे खायचे आणि अधिकचे जमा झालेले पैसे हनुमान मंदिर पिंपळगाव च्या दानपेटीत टाकायचे असा नित्यक्रम होता
पूजाअर्चा करणे आणि मंदिरात जाणे हा क्रम दिवसभर होता आज ती व्यक्ती मरण पावली ही बातमी गावात देण्यात आली स्थानिक पोलिस पाटील व सरपंच यांच्या सूचनेवरून गावातील लोकांनी त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार पार पडला
यावेळी गावातील बहुसंख्य प्रचंड प्रमाणात महिला स्त्री पुरुष उपस्थित होते कारण ती व्यक्ती प्रत्येकाच्या घरापर्यंत नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी जात होती व प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला आपल्या घरचा जवळची व्यक्ती समजत असत म्हणून त्याच्या मरणानंतर सुद्धा आज मोठ्या प्रमाणात त्याचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला
आणि दिनांक 12 फेब्रुवारी 2022 ला चौदावी चा कार्यक्रम स्थानिक पातळीवर सार्वजनिक वर्गणी करून करण्यात येणार आहे
हिंदू पद्धतीने अंत्यसंस्काराची क्रिया पार पडली आणि सर्व सोपस्कर कार्य आजच पार पडले यावेळी सर्व गावकरी हजर होते , डोकराचे स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमी परिसरात एक झाड सुद्धा लावण्यात आले