हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे विज पडल्याने दोन बैल ठार.

✒प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि 31,मे:- तालुक्यातील मौजा बोपापुर येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात विज पडल्याने रामदासजी खोडे मु. फुकटा, यांचे दोन बैल जागीच ठार झाले. सायंकाळी 6:30 वाजच्या दरम्यान वादळी वारा विजेच्या कडकडाट शेतामध्ये बंड्याच्या कडेला बैल जागीच ठार झाले.
शेतकरी बंड्या मध्ये हजर होता, शेतकऱ्याचे प्राण वाचले ऐन पेरणीच्या हंगामात ह्या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी मागत आहे. गावातील सरपंच उमाटे, पोलीस पाटील घटनास्थळी डॉ. सचिन स खेमलापुरे, पशुधन विकास अधिकारी व भानुदास कुकर्डे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -1 पटवाडी यांनी पंचनामा केला. वडनेर पोलीस कर्मचारी प्रफुल चंदनखेडे पाहणी केली.








