Home धाराशिव श्री दत्त साई ट्रस्ट वाठवडा व ज्येष्ठ नागरिक महासंघ कळंब च्या वतीने...

श्री दत्त साई ट्रस्ट वाठवडा व ज्येष्ठ नागरिक महासंघ कळंब च्या वतीने किराणा किटचे वाटप

245

श्री दत्त साई ट्रस्ट वाठवडा व ज्येष्ठ नागरिक महासंघ कळंब च्या वतीने किराणा किटचे वाटप

अच्युत पौळ
कळंब, प्रतिनिधी

कळंब, जि .धाराशिव दि.,३१ ऑक्टोबर 2025 कळंब तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून
झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतीचे शेतीतील पिकाचे तसेच नदीकाठी असलेल्या असून काही घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्यासह संसारोपयोगी
साहित्याचेही नुकसान झाले आहे याची दखल घेत वाठवडा येथील सुपुत्र व महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे ठाणे,
मुंबईचे अध्यक्ष अण्णासाहेब शहाजी टेकाळे आणी त्यांचे बंधू शिवाजी शहाजी टेकाळे व श्री. दत्तसाईमंदिर वाठवडा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. शुशिलाताई टेकाळे यांच्या संयुक्त
विद्यमाने एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा सामाजिक भावनेतुन पूरग्रस्त भागातील बाधीत नागरीक व गरजवंतांना कळंब
तालुक्यातील वाठवडा या गावात ४०० किराणा किट तसेच साड्या वाटप व कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे २५ किट पाठविण्यात आल्या होत्या बालकाश्रम येथे सध्या अनाथ मुले नसल्याने आश्रमाचे संचालक व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघ कळंब तालुका यांच्या साह्याने या संसार उपयोगी वस्तू किटचे कळंब शहरातील अनाथ, अपंग ,असाह्य गरजू लोकांना त्यांच्या घरी जाऊन व बालक आश्रम येथे दि.३१ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड , हे होते तर प्रमुख उपस्थितीतामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उप सभापती ऍड,दिलीपसिंह देशमुख, स्वप्नपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थचे चेअरमन विठ्ठल माने, ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, पंचायत समिती माजी उपसभापती लक्ष्मण अडसूळ, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव माने,अच्युत पौळ,शरद खंदारे, मधुकर शीलवंत ,यशवंत हौसलमल हनुमंत पाटुळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव महाराज अडसूळ यांनी, सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सचिन क्षिरसागर यांनी मानले