शहिदांचे बलिदान हे देशातील युवकांना नव चेतना देणारे-डॉ. मंगेश गुलवाडे

69

शहिदांचे बलिदान हे देशातील युवकांना नव चेतना देणारे-डॉ. मंगेश गुलवाडे

शहिद दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने आदरांजली कार्यक्रम संपन्न.

 The sacrifices of the martyrs are the ones who give new consciousness to the youth of the country-Dr. Mangesh Gulwade

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने शहीद दिना निमित्य शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

त्यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी सांगितले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान हे भारतातील युवकांना देशसेवेसाठी नवचेतना देणारे असुन आज शहीद दिनानिमित्य प्रत्येक युवकांनी संकल्प करायला हवे की आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देश सेवा कशी करू शकतो याचा विचार युवकांनी करायला हवा असे त्यांनी मत व्यक्त केले सदर आदरांजली कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी बाबूपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे,नगरसेवक प्रदीप किरमे भाजयुमो चंद्रपूर महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू,भाजपा सचिव चांदभाई पाशा,अमोल नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.