चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 276 पॉझिटिव्ह

56

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 109 कोरोनामुक्त ; 276 पॉझिटिव्ह

आतापर्यंत 24,351 जणांची कोरोनावर मात, ॲक्टीव पॉझिटिव्ह 1480

109 corona free in last 24 hours in Chandrapur district; 276 Positive

सौ हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि.25 मार्च:- जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 276 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 244 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 351 झाली आहे. सध्या 1480 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 59 हजार 894 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 27 हजार 916 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 276 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 120, चंद्रपूर तालुका 29, बल्लारपूर 11, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 12, नागभिड तीन, सिंदेवाही 14, मूल सात, सावली चार, पोंभुर्णा एक, राजूरा चार, वरोरा 40, कोरपना सात व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.