बनावटी तहसीलदाराने केला घटस्फोटित महिलेवर अत्याचार.
✒️युवराज मेश्राम नागपुर प्रतिनिधी✒️
नागपुर,दि.26 मार्च:- आज देशात महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. नागपूर येथे अशीच एक घटना समोर आली आहे. स्वता नायब तहसीलदार असल्याचे भासवुन लग्नाचे आमिष देऊन एका 31 वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार केल्याची घटना नागपुर येथील कपिलनगर परीसरातुन समोर आली आहे. पिढीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन नागपुर येथील मानकापूर पोलिसांनी पारितोष दीपक डांगे वय 30 वर्ष, रा. रेवतीनगर, बेसा, नागपुर याच्याविरुद्ध विविध कलमा अन्यवे अत्याचाराचा गुन्हा नोंद केला.
नागपुर येथील एक महिला घटस्फोटीत असून, तिला एक छोटा मुलगा आहे. ती गेले अनेक दिवसा पासुन कपिलनगर परीसरात राहाते. एप्रिल 2020 मध्ये पारितोष दीपक डांगे वय 30 वर्ष, रा. रेवतीनगर, बेसा, नागपुर याने या पिडीत महिलेला सोशल मिडीयाच्या प्रसिद्ध फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. त्या महिलेने फ्रेण्ड रिक्वेस्ट ती स्वीकारली. त्यानंतर पारितोष दीपक डांगे हा तिच्या बरोबर म्यासेजचे अधाण प्रधान सुरु झाले. आपण नायब तहसीलदार असुन मला तुम्ह्चा बरोबर लग्न करायच आहे. असे खोटे आमिष देऊन तो त्या पिडीत घटस्फोटीत महिलेवर अत्याचार सुरु झाला. जेव्हा ही महिला त्याला लग्नाविषयी बोलली तर त्यांने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे तीला अस वाटलं की त्या तोयत्या नायब तहसीलाने मला फसवल आणि माझ्यावर अत्याचार केला. त्यामुळे ती महिला नागपुर येथील कपिलनगर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांचा विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला.