हळद सुखन्या आधीच झाली विधवा, नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी.
हळद सुखन्या आधीच झाली विधवा, नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी.

हळद सुखन्या आधीच झाली विधवा, नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी.

हळद सुखन्या आधीच झाली विधवा, नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी.

✒आशीष अंबादे प्रतिनिधि✒
वर्धा,दि.27 मार्च:- जिल्हातील हिंगणी गावातुन एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे हिंगणी गावातील प्रत्येक नागरीकांचे मन सुन्न झाले आहे. सर्वांचा साक्षीने लग्न झाले. लग्नाचे सर्व संस्कार योग्य पणे पार पडले. मात्र, आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत नव विवाहीक जीवनाचे सप्न बघण्याचा आधीच तिच्या पतीवर काळाने डाव साधला.

19 मार्च ला गडचिरोली जिल्हातील चामोर्शी येथील वधू मंडपी लग्न झाल. त्यामुळे सासुरवाडी सत्यनारायणाची कथाचा कार्यक्रमासाठी नव पती  पत्नी हे चामोर्शी येथे गेले होते.  सुभाष दशरथ मराठे वय 28 रा. हिंगणी असे मृताचे नाव आहे. स्थानिक पुरातन शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या सुभाष मराठे याचा विवाह 19 मार्च रोजी चामोर्शी जि. गडचिरोली येथे वधू मंडपी धूमधडाक्‍यात अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला. सुभाष हा घरचा मोठा मुलगा असून तोच कमावता होता. तो नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील लोहा कंपनीत साहित्य गुणवत्ता तपासणी पदावर कार्यरत होता. तो कथेसाठी नववधूसोबत चामोर्शी येथे गेला होता. 24 मार्च रोजी सकाळी कथा आटोपल्यावर जेवणावळी सुरू होत्या. लग्नाच्या लगबगीचा भार एकट्यावर असल्याने चांगलीच दगदग झाली होती. कथा झाल्यावर उसंत मिळाल्याने तो विश्रांती घेत असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने विश्रांती घेतली. यानंतर थोडे बरे वाटू लागेल, असे त्याला वाटले. मात्र, काही वेळातच त्याने नेहमीसाठीच न परतण्यासाठी जीवनातून विश्रांती घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सायंकाळी त्याचे पार्थिव घेऊनच नववधू सेलूला पोहोचली. गुरुवारी त्याच्यावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष हा स्थानिक इसार पेट्रोल पंपचे व्यवस्थापक पंकज पुरुषोत्तम वाल्दे याचा मामे भाऊ असून त्याच्या पश्‍चात वृद्ध आईवडील, नवविवाहित पत्नी व लहान भाऊ, असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here