विदर्भात कोरोनाचा विस्फ़ोट, माघील 24 तासात 10428 बांधीत रुग्णाची भर, 119 जणांचा मृत्यू.
✒️मुकेश चौधरी विदर्भ ब्युरो चीप✒️
नागपूर,दि.8 एप्रिल:- विदर्भात कोरोना वायरसचा विस्फ़ोट सुरु असुन विदर्भात कोरोना वायरसची दुसरी लाट खुप भयानक स्थितीत गेल्याची आकडेवारी वरुन समोर येत आहे. विदर्भात दि. 7 एप्रिल बुधवारला कोरोना वायरस बांधीत रुग्णांच्या संख्येने 10 हजारांचा पल्ला पार केल्याने, विदर्भातील जनतेचा काळजाचे ठोके वाढवले आहे. तर काल कोरोना वायरस बांधीत मृतांची संख्या 100 च्यावर गेली आहे.
माघिल 24 तासात नागपूर जिल्ह्यात कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच 5 हजाराच्या वर गेला. काल नागपूर शहरात 3283, तर नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 2055 कोरोना बांधीत रुग्ण मिळुन आले. नागपुर जिल्ह्यातील मृतांचा आकडाही 66 वर गेला असल्याने नागपुरकरामध्ये भीतीच वातावरण दिसुन येत आहे.
विदर्भातील जिल्हानिहाय कोरोना वायरस बांधीत आकड़ेवारी
जिल्हा पॉझिटिव्ह मयत
नागपूर :- 5,338 66
वर्धा :- 684 06
भंडारा :- 1,177 09
गोंदिया :- 571 06
चंद्रपूर :- 637 05
गडचिरोली :- 160 03
अमरावती :- 344 04
यवतमाळ :- 350 08
अकोला :- 263 08
वाशीम :- 269 02
बुलढाणा :- 625 02
एकूण 10,418 119