पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, सिंदेवाही तालुक्यातील येथील घटना.
पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, सिंदेवाही तालुक्यातील येथील घटना.

पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, सिंदेवाही तालुक्यातील येथील घटना.

पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, सिंदेवाही तालुक्यातील येथील घटना.
पट्टेदार वाघाचा महिलेवर घरात घुसून हल्ला, महिला गंभीर जखमी, सिंदेवाही तालुक्यातील येथील घटना.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर (गुंजेवाही ) दिनांक 18:- सिंदेवाही तालुक्यातील 16 किमी अंतरावर अती दुर्गम भागात वसलेल्या खैरी(चक) या गावातील विदारक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. पट्टेदार वाघाने रात्रौचा कानोसा घेऊन शेळ्यांना हल्ला करण्याच्या दृष्टीने त्या घरात प्रवेश केला. शेळ्या वर हमला करणार तेवढ्यात आवाजाची चाहुल लागताच घराचा दरवाजा उघडला तेव्हा लगेच त्याच पट्टेदार वाघाने हमला करून गंभीर या महिलेला जखमी केले. त्या महिलेचे नाव सुनंदा मेश्राम वय 60 वर्ष. याच जखमी महिलेने आरडाओरड करताच घरातील व घराशेजारील मानसे जमा होताच त्या आवाजाने जवळ असलेल्या जंगलात पळून गेला.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या खैरी गावाला लागूनच घनदाट जंगल आहे. त्याच जंगलात वन्यजीवांचा वास्तव्य आहे. त्या लगत मोठा जलाशय आहे. तेथेच हिंस्त्र प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. खैरी या छोट्याशा गावात राहात असलेली आणि अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत असलेली सुंनदा मेश्राम मोलमजुरी करून आपली उपजिविका करत असतात. अशातच थकुन भागुन स्वतः च्या घरात गाढ झोपेत असताना. तीच्या घरच्या शेळ्यांचा आवाज ऐकू येताच कुणी तरी घरी आल्याचा भास झाल्याने त्याच अवस्थेत घराचा दरवाजा उघडला. पहाताच समोरच असलेल्या पट्टेदार वाघाने हमला केला. लगेच त्या महिलेने आरडाओरड करताच कुंटूबातील व घराशेजारील मानसे जमाव होताच तो जंगलात पळून गेला. तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना गावात येवून हल्ला चढवला असल्याने या गावात भितीचे वातावरण पसरली. असुन दहशत निर्माण झाली आहे.

मानव आणि वन्यजीव यांच्यात जणू काही संघर्षाचा सामना रंगला आहे की काय असे चित्र उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या गावाशेजारी मोठे जलाशय व त्यालगत घनदाट जंगल असल्याने जंगलातले वन्य प्राणी गावात येऊ लागल्याने जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा गंभीर घटना घडत असल्याने वनविभागाकडुन जंगलात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु ह्या गंभीर हल्ल्याच्या घटना गावागावात घडत असल्याने आता गाव सोडून जायचे कां? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनविभागाने अशा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाघांचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होऊन कायदा हातात घेतल्या शिवाय पर्याय उरणार नाही. असे भयभीत झालेली जनता बोलुन दाखवीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here