मुंबईत 55 वर्षिय महीलेचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मुत्यूदेह.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.19 एप्रिल:- मुंबईतील करी रोड येथीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने मुळे सामाजमन हेलावल आहे. आज जग खुप जवळ आल आहे, पण लोक खुप दुर गेले असल्याचे अनेक घटना वरुन दिसून येत आहे. आज आज नात्यातील दुरावा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक वृध्द आई वडिलांना एकच रहाव लागत असल्याच वास्तव समोर येते.

मुंबई येथील करी रोड येथील श्री पिंपळेश्वर सोसायटीच्या तळमजल्यावर एका 55 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोसायटी मधिल लोकांचे मन हेलावले आहे.

एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या पिंपळेश्वर सोसायटीत 55 वर्षीय महिला एकटी राहत होती. गेले दोन ते तीन दिवस ती घराबाहेर पडली नव्हती. त्यानंतर त्यांच्या घरातून कुजलेला वास येऊ लागला. या कारणामुळे याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. शुक्रवारी अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचताच घराचा दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यानंतर महिला मृत अवस्थेत फरशीवर पडली होती. पोलिसांनी मृतदेह नायर रुग्णालयात दाखल केलं, इथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here