केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर.
खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार.
ब्रह्मपुरीकरांच्या वतीने अतुल देशकर यांनी मानले गडकरीचे आभार.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर.
केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या कडून ब्रह्मपुरीला 2 मिनी व्हेंटिलेटर.
अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी 
ब्रह्मपुरी:- मधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यात आरोग्‍य यंत्रणा कमी पडत असताना, व्‍हेंटीलेटर व ऑक्सीजनचा तुटवडा भासत असताना क्षेत्राचे खासदार अशोक नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे व्हेंटिलेटर देण्याबाबत विनंती केली होती. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रह्मपुरीसाठी 2 मिनी व्हेंटिलेटर (Bipap) उपलब्ध करून दिले. 
आज दि. 23 रोजी खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी सदर 2 मिनी व्हेंटिलेटर IMA हॉल येथे डॉ.सुनील नाकाडे व डॉ. श्रीकांत नागमोती यांच्याकडे व आस्था कोविड रूग्‍णालय येथे डॉ. सुमित जयस्वाल यांच्याकडे रूग्‍णांसाठी सुपूर्द केले.
ब्रह्मपुरी येथे दिलेल्या मदतीबद्दल माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. ब्रह्मपुरीची परिस्थिती लक्षात घेता अजून मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी गडकरीकडे केली असल्याचे माजी आमदार अतुल देशकर यांनी संगितले आहे.
या वेळी तहसीलदार पवार साहेब, जि.प माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री क्रीष्णा सहारे, भाजपा नगर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, भा.ज.यु. मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, युवा मोर्चा नगर महामंत्री स्वप्नील अलगदेवें उपस्थित होते. ब्रह्मपुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली ही मदत उल्लेखनीय आहे. या मिनी व्हेंटिलेटरच्या साह्याने रुग्णांना उपचारासाठी मोलाची मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here