वर्धा जिल्हातील गौळ येथे कोरोना बाधीत रुग्णांची आत्महत्या.

57

वर्धा जिल्हातील गौळ येथे कोरोना बाधीत रुग्णांची आत्महत्या.

वर्धा जिल्हातील गौळ येथे कोरोना बाधीत रुग्णांची आत्महत्या.
वर्धा जिल्हातील गौळ येथे कोरोना बाधीत रुग्णांची आत्महत्या.

प्रशांत जगताप,प्रतिनिधी 

वर्धा,दि. 26 एप्रिल:- वर्धा जिल्हातील देवळी तालुक्यातील गौळ येथुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना वायरस बाधीत रुग्णांने आत्महत्या केल्याने गौळ गावात एकच खळबळ माजली आहे.

गौळ येथील राहणा-या एका व्यक्तीला कोरोना वायरस लागण  झाली होती. तो गृहविलगीकरणात आपल्या घरीच उपचार घेत होता. पण 23 एप्रिल रोजी दुपारची सुमारास गळाफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या मृतक व्यक्तीचे नाव सुधाकर थुल वय 40 वर्ष असे आहे.

सुधाकर थुल याने घराचा छताला गळाफास लाऊन आत्महत्या केल्याचे पत्नीचा लक्षात येताच त्यांनी शेजारी राहणा-या लोकांना यांची माहिती दिली. आणि देवळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले आणि पंचनामा करुन मृत्यदेह उर्वरित करवाई साठी नेण्यात आला. या घटनेची नोंद करुन, पुढील तपास पोलिस करत आहे.