पट्टेदार वाघाने केले बकऱ्याला जागीच ठार! हळदा शेत परिसरातील घटना.

✒अमोल माकोडे,ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी✒
ब्रह्मपुरी:- चराईसाठी नेलेल्या कळपावर पट्टेदार वाघाने हल्ला करून कळपातील एका बकऱ्याला जागीच ठार केल्याची घटना हळदा येथील गावातल्याच एका शेतकऱ्यांच्या शेतात सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घडली.

जंगल व्याप्त भागात असलेल्या हळदा-आवळगाव परिसरात वाघाचे मोठ्याप्रमाणात दहशत असून पट्टेदार वाघान अनेक जनावरांना ठार करीत असल्याच्या घटना या भागात वारंवार घडत आहेत तर हळदा- आवळगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हळदा येथील रहिवासी व शेळ्या पालन करणाऱ्या प्रकाश रामदास ठाकरे यांचा मुलगा मनोज प्रकाश ठाकरे यांनी गावातील नागोजी गेडाम यांच्या शेत शिवार परिसरामध्ये सकाळी शेळ्या चराईसाठी साठी नेले असता दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवल्याने कळपा मधील एका बकऱ्याला जागीच ठार केले. त्यामध्ये प्रकाश ठाकरे यांचे 12 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती हळदा आवळगाव वनविभागाचे वनरक्षक बाबुराव वड्डे यांना देण्यात आली त्यांनी सदर घटनास्थळी येऊन वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बकऱ्याचा पंचनामा केला आहे. सदर बकरा मालक आर्थिक संकटात सापडला असून प्रकाश ठाकरे यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी हळदा येथील नागरिकांनी कडून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here