महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शीविगाळ व जिवे मारण्याची धमकी, शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा.
तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
राजुरा,दि.05:- राजुरा येथील बामनवाडा परीसरातिल तक्षशीला नगर येथिल लघु दाब (L/T) विद्युत वाहिनीवर, काही झाडे लागून विज पुरवठा खडिंत होण्याचा प्रकार, राहुल वासेकर कार्यरत लाईनमन यांच्या लक्षात आले, व तशी माहिती त्यानी साहाय्यक अभियंता यांना दिलि व ट्री कंटिग (विद्युत वाहिनीला लागत असलेल्या फांद्या कापणे) घेण्यात आली. परंतु तक्षशीला नगर येथील, निवारण कांबडे (शिक्षक) यांचा मोठा मुलगा श्रिनिल कांबळे व लहान मुलगा प्रसंजित कांबळे हे वरिष्ठ तंत्रज्ञ विलास बनकर, सह लाईनमन राहुल वासेकर व साहाय्यक अभियंता ठमके यांच्या अगांवर धावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्य भाषेत शीविगाळ करुन ट्री कंटिग करण्यास मनाई केली.
त्यामुळे राजुरा येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारयां- च्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या अगोदर सुधा ७ मार्च २०२१ रोजी संजय लांडे लाईनमन यांच्या घरावर काही लोकांनी रात्र हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, व घराची तोडफोड सुधा केली होती.
अश्या प्रकरणाचा विचार केल्यास महावितरण कंपनीचे कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यामुळे अश्या हलेखोरांवर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी अशी मागणी राजुरा येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी करीत आहेत, त्वरीत अटक करून गुन्हा न नोंदवल्यास सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सुधा राजुरा येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी दिला.