बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन मुलुंड महिला आघाडीतर्फे रक्तदान शिबिर.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई, दि10मे :- मुलुंड वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने बहुजन ह्रदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी समस्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिरासाठी प्रयत्न केला होता. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असुन अनेक रक्तदात्यांकडून रक्तदान देण्यात आले.

आज देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्मान झाली आहे. त्यामुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्या रक्तदात्यांनी रक्तदान दिल त्याचे त्याबद्दल सर्वांचे मुलुंड वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुनीताताई गायकवाड-ई.जि.अध्यक्षा, सौ.वनिता कांबळे ई.जि.महासचिव, सौ. सुनीता जानराव ई.जि. सदस्य हया होत्या. तर आयोजक वंचित बहुजन महिला आघाडी मुलुंड विधानसभा सौ.अर्चना श्रीधर मिसळे तालुका अध्यक्षा, सौ.भाग्यश्री गवळी उपाध्यक्षा, सौ. वैशाली सकपाळ उपाध्यक्षा, सौ. रेखा जाधव उपाध्यक्षा, सौ. प्रगती जाधव महासचिव, सौ.प्रमिला बर्वे सचिव, सौ.रंजनी कर्डक सचिव, सौ.सुनीता गाडे १०७ वार्ड अध्यक्षा, सौ.चादंणी पवार-१०८ वार्ड अध्यक्षा, सौ.शांता सोनावणे-१०८ वार्ड सदस्य, सौ.सुनीता भालेराव आणि मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्ता उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here