वर्धा जिल्हा गो तस्करी, तवेरा गाडी बरोबर दोन गायी, चार कालवड जप्त.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा/कारंजा,दि.13मे:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध गो तस्करी सुरु असल्याची माहिती वेळोवेळी समोर येत असते. अशीच एक खळबळजनक बातमी वर्धा जिल्हातील कारंजा येथून समोर येत आहे. त्यामुळे या गो तस्करीचे जिल्हा मोठ्या प्रमाणावर राकट सक्रीय असल्याचे समोर आले आहे.
कारंजा येथे काल 3.30 रात्रीच्या दरम्यान अवैध जनावरे कोंबून नेत असलेल्या तवेरा गाडी आष्टी पोलीस स्टेशन येथील बॅरिकेटिंग तोडून भरधाव वेगाने तळेगाव पोलिसांना हुलकावणी देऊन कारंजा कडे येत असल्याची माहिती कंट्रोल रूम वर्धा यांच्या कडून मिळाल्या बरोबर कारंजा पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच कारंजा पोलीस स्टेशन चे कर्मचारी निलेश मुंढे, विनोद वानखडे, प्रशांत मानमोडे, उमेश खामतकर सह होमगार्ड विनोद वनस्कर ,शुभम ,यांनी ताबडतोब कारंजा येथील टोल नाक्यावर नाकेबंदी केली.
मात्र तेथूनही भरधाव वेगाने येत टोलनाका तोडून आरोपी गाडी घेऊन पळून लागले असता कारंजा पोलिसांच्या जीपने त्यांचा पाठलाग केला असता नारा गावजवळील खडका नदीत तवेरा गाडी 12 फूट खाली गेली त्यामुळे गाडीमधील ड्रायव्हर व आरोपी रात्रीच्या अंधारात पळून गेले सदर तवेरा गाडीत दोन मोठया गाई, चार लहान गाई, मिळून आल्या असून 2 लाख 85 हजाराचा माल मिळून आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे