Home latest News विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी; भाजप शाख़ा तर्फे...

विरूर स्टेशन येथे कोरोना लसीकरण केंद्र शुरू करण्याची मागणी; भाजप शाख़ा तर्फे निवेदन.

83

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि

राजुरा/ विरूर :- मागील काही महिण्यापासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव बघता. गावोगावी कोरोनाची लागण झालेली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथे मागील दोन महिण्यापासुन लस दिली जात आहे. परंतु विरूर स्टेशन व इतर 10 गावातील लोकांना कोविड लसीकरण करिता चिंचोली जाण्यास एसटी बस बंद असल्याने अन्य वाहन साधन उपलब्ध नाही. यामुळे क्षेत्रातील अनेक लोकांना लसीकरण केंद्रावर पहुचण्याकरिता कमालीचा त्रास होत असुन कित्येकांना लसीकरणापासुन वंचीत रहावे लागत आहे. करिता विरूर स्टेशन येथे तातडीने कोविड लसीकरण केंद्र शुरू करण्याकरिता माजी आमदार संजयभाऊ धोटे यांना निवेदन देतांना भाजप शाख़ा विरूर शहर अध्यक्ष  भिमरावजी पाला सह सतिशभाऊ कोमरवेल्लीवार, श्याम कस्तुरवार, रामअवतार सोनी.