नियमांचे भंग केल्यामुळे मोमीनपूरा मार्गावरील 4 दुकाने करण्यात आली ‘सील’ तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई.

52

नियमांचे भंग केल्यामुळे मोमीनपूरा मार्गावरील 4 दुकाने करण्यात आली ‘सील’ तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई.

नियमांचे भंग केल्यामुळे मोमीनपूरा मार्गावरील ४ दुकाने करण्यात आली 'सील' तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई.
नियमांचे भंग केल्यामुळे मोमीनपूरा मार्गावरील ४ दुकाने करण्यात आली ‘सील’ तहसील पोलीस आणि मनपाची संयुक्त कारवाई.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर, दि. 14 मे
:- नागपूर 
शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ क्र. 3 मध्ये येणाऱ्या तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत मोमीनपूरा मार्गावर पोलीसांची धडक कारवाई सुरू असुन आज गुरूवारी पोलीस उपायुक्त श्री लोहीत मतानी यांचे मार्गदर्शनाखाली आणि तहसील पोलीस स्टेशनचे वपोनि श्री जयेश भांडारकर यांचे नेतृत्वात ही कारवाई सुरू केली.

मोमीनपूरा भागातील काही दुकानदारांनी शासनाच्या ‘ब्रेक द चैन’च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीसांनी मनपाचे सहकार्याने परिसरातील दुकानदारांवर कडक कारवाई करीत 4 दुकाने ‘सील’ केली आहेत. या कारवाईमुळे नियमांना बाजुला सारून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांनी धसका घेतला आहे. काल बुधवारी देखिल तहसील पोलीसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती हे विशेष!

आज सकाळपासून पुन्हा धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली असुन लाकडाऊन असेपर्यंत दररोज अशीच कारवाई सुरू राहील अशी माहीती परिमंडळ क्रमांक ३ चे पोलीस उपायुक्त श्री लोहीत मतानी यांनी सांगितले.