तौत्के वादळ; धुळेमध्ये अंगावर विजेची तार पडून महिलेचा मृत्यु.

51

तौत्के वादळ; धुळेमध्ये अंगावर विजेची तार पडून महिलेचा मृत्यु.

तौत्के वादळ; धुळेमध्ये अंगावर विजेची तार पडून महिलेचा मृत्यु.
तौत्के वादळ; धुळेमध्ये अंगावर विजेची तार पडून महिलेचा मृत्यु.

✒️धुळे जिल्हा प्रतिनिधी✒️
धुळे,दि.18 मे:- तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर धुळे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात आणि धुळ्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे आणि या वाऱ्यामुळे धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जय शंकर कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या आशा येवले या 50 वर्षीय महिलेच्या अंगावर विजेची तार पडून शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरासमोरील विद्युतवाहक तारांमध्ये स्पार्किंग होत असल्याची तक्रार संबंधित वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली होती. तरी देखील याकडे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हि दुर्घटना घडली आहे.