नकोडावासियांच्या सेवेत रुजू झाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर; आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार
जिल्हाध्यक्ष डॉ. गुलवाडे व पाझारे यांच्या हस्ते हस्तांतरण.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की माजी पालकमंत्री,अध्यक्ष विधिमंडळ लोकलेखा समिती आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे चंद्रपूरकरांसाठी प्राप्त ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे दोन दिवसांपूर्वी आ.मुनगंटीवार यांचे हस्ते चंद्रपुरात लोकार्पण करण्यात आल्या नंतर नकोडा येथील ग्रामवासीयांच्या सेवेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुजू झाले.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री,जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांचे हस्ते प्रा. आरोग्य उपकेंद्र नकोडाला ते हस्तांतरीत करण्यात आले. यावेळी सरपंच किरण बांदूरकर माजी सरपंच ऋषी कोवे, मंगेश राजगडकर,बाळा झाडे, अंजैया गोंनपल्लीवार, महादेव वाघमारे, रवी देहारकर, विक्की कुळमेथे, संजय लोढे,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चे हस्तांतरण झाल्यानंतर डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी कॉन्सन्ट्रेटर वापराची पद्धत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना समजावून सांगितली.या कॉन्सन्ट्रेटर मुळे नकोडावासियांचे प्राण रक्षण होऊ शकते असे ते म्हणाले. यावेळी बोलताना ब्रिजभूषण पाझारे यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चे महत्त्व विशद करीत नकोडावासीयांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी सदैव उभी असून सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सरपंच किरण बांदूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.








