गांगापुर येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवदान.

49

गांगापुर येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवदान.

गांगापुर येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवदान.
गांगापुर येथे सर्प मित्राने दिले सापाला जीवदान.

✒प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- तालुक्यातील गांगापुर मध्ये राहणा-या सुरेश येलके यांच्या घरी 3 फुट लांबीचा गवारा साप असल्याचे दिसून आले. सर्प घरात असल्यामुळे काही वेळ भितीच वातावरण निर्माण झाल होते.

सुरेश येलके यांचा घरामधिल स्वयंपाक घरात साप आढळून आल्यामुळे तातडीने सर्पमित्र यांना दूरध्वनी वरून यांनी संपर्क केला. सर्पमित्र तात्काळ गांगापुर गावात दाखल झाले सर्पमित्र आनंद सिंग, मयूर ऊईके, प्रकाश वाघ, यांनी तेथील नागरिकांच्या साहाय्याने गवारा सापाला पकडले व सापाबद्दल माहिती दिली. हा विषारी साप आहे, माणसाला चावला की तुरंत मरतो, नंतर सर्प मित्रांनी टीम यांच्या साहाय्याने खापरी जंगलात सुखरूप सोडून दिले या सापाची नोंद करण्यात आली. लोकांची गर्दी वाढली होती सापाला पाहण्यासाठी आनंद शिंग, लोकेश राऊत, सचिन महाजन उपस्थित होते.