कायर, पिपळखुटी येथे रॅकपॉईंट त्वरित सुरु करा; खासदार बाळू धानोरकर यांची पालकमंत्री, रेल्वे विभागाकडे मागणी.

62

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
वणी :- वणी, कायर, झरी, केळापूर तालुक्यातील पाटणबोरी व पुढे आदिलाबाद पर्यंत रेल्वे मार्ग असताना अद्यापही या विभागात हक्काचा रॅक पॉईंट नाही. त्यामुळे वणी उपविभागीय वितरक आणि शेतकऱ्यांना धामणगाव येथून पुरवठा होणाऱ्या खतावर निर्भर राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची हि समस्या मार्गी लावण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. नुकत्याच यवतमाळ येथे जिल्हा नियोजन सभागृह येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हि मागणी केली होती. त्यासोबतच रेल्वे विभागासोबत देखील खासदार बाळू धानोरकर यांनी पाठपुरावा केला आहे. लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे.

कायर व पिपळखुटी येथे खतासाठी रॅक पॉईंट सुरु होण्यास सर्वच साधन सोयी व अनुकूलता आहे. वाशीम व धामणगाव येथून यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वितरकांना खताचा पुरवठा केला जातो अनेकदा यात अनियमितता होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांना होणारा हा नाहक त्रास कमी करण्याकरिता कायर, पिपळखुटी येथे रॅकपॉईंट त्वरित सुरु करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी पालकमंत्री, रेल्वे विभागाकडे केली आहे.