वाघाने घेतला पेंढरी येथील एका महिलेच्या नरड्याचा घोट.

56

वाघाने घेतला पेंढरी येथील एका महिलेच्या नरड्याचा घोट.

वाघाने घेतला पेंढरी येथील एका महिलेच्या नरड्याचा घोट.
वाघाने घेतला पेंढरी येथील एका महिलेच्या नरड्याचा घोट.

✒त्रीशा राऊत, चिमुर तालुका प्रतिनिधी✒
चिमुर,दि.19मे:- पेंढरी शिवारातील जंगलात जाळण्यासाठी सरपंण आनण्या करिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले. ही घटना 19 मे सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सीताबाई गुलाब चौखे असे मृत महिलेचे नाव असून ती पेंढरी येथील रहिवासी आहे.

सकाळी सीताबाई या जंगलात सरपण आणायला गेल्या होत्या, तेथे धबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक सीताबाई वर हल्ला केला. त्यानंतर सीताबाई ला जंगलात फ़रफरत खीचत नेले. त्यात तिच्या जीव गेला. यांची माहीती गावक-यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर मृत सीताबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. वनविभागाच्या मते, हल्लेखोर वाघीण सातत्याने जनावरे व माणसांवर हल्ले करित असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून वन विभाग या वाघिणीच्या मागावर असून तिच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहे. या वाघिणीला पकडून जेरबंद करण्याचा वनविभागाचा प्लॅन असला तरी अद्याप त्यात यश आलेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये वनविभागाप्रती प्रचंड रोष दिसून येत आहे.