गोरगरिबांना न्यायासाठी पाचोरा कॉग्रेस लढा देणार : सचिन सोमवंशी.

58

गोरगरिबांना न्यायासाठी पाचोरा कॉग्रेस लढा देणार : सचिन सोमवंशी.

गोरगरिबांना न्यायासाठी पाचोरा कॉग्रेस लढा देणार : सचिन सोमवंशी.
गोरगरिबांना न्यायासाठी पाचोरा कॉग्रेस लढा देणार : सचिन सोमवंशी.

ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बाळद येथील एका शेतकर्याने घरगुती मिटर साठी तब्बल दोन महिने पाठपुरावा केल्यानंतर हतबल झाल्याने अखेर कॉग्रेस पदाधिकारी कडे धाव घेताच अर्धा तासातच विज मीटर घराबाहेर लावण्यात आले.

विज चोरी रोखायची असेल तर जास्तीत जास्त विज मीटर ग्रामीण भागात द्यायला हवे मात्र दोन महीनेहुन अधिक कालावधी डीमांडनोट भरल्यावर देखील विज मीटर मिळाले नाही. असाच वैतागलेला तालुक्यातील बाळद येथील शेतकरी शरीफखा पठाण यांनी विज वितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या मागे गेल्या दोन महिन्यांपासून विज मीटर बसविण्यासाठी वारंवार संपर्क केला असता उत्तर ना चे मिळाले त्यातच टाळाटाळ केली जात होती. अशा अवस्थेत कुणाला आपली व्यथा सांगावी म्हणून कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना संबंधित इसमाने मोबाईल वरुनच ही माहिती दिल्यावर श्री. सोमवंशी यांनी मला थोडा वेळ द्या लागलीच काम करतो असे आश्वासित केले असता या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क करुन तातडीने आजच मिटर बसवा असा आग्रह केल्याने लागलीच अर्धा तासात सबंधिता कडे विज मिटर घेऊन जेव्हा विज वितरण कंपनीचे कर्मचारी गेल्या नंतर सबंधित पठाण यांना आच्छर्याचा धक्का बसला. कॉग्रेस कार्यकर्ता खरोखर गोरगरिबांचा कैवारी आहे अशा शब्दात पठाण यांनी सोमवंशी यांचे आभार मानले.

यावेळी  सोमवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी म्हटले की. कॉग्रेस ही गोरगरिबांचा विचार करणारी विचारधारा आहे पाचोरा तालुक्यातील कोणत्याही शेतकरी असो कुणी अडलेल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे धोरण आहे. कॉग्रेस कार्यकर्ता हा रात्रंदिवस गल्ली ते दिल्ली सर्वसामान्य जनतेसाठी न्यायासाठी लढत आहे तर कोरोना महामारी सर्वात जास्त मदत कॉग्रेस कार्यकर्ता करीत असल्याचे शेवटी सांगितले.