छायाताई कुंभारे यांच्या हस्ते धानोरा ग्रामीण रूनग्लायला 25 ऑक्सिजन सिलेंडर ची दिली मदत.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- करोना संसर्ग रोगाची साथ सुरू आहे करोना रुग्ण रुग्णालयात भरती होत आहे करोना रोगाच्या उपचारा सोबत ऑक्सिजन ची फार आवश्यकता असते अन्यता रुग्ण मृत्यू पाऊ शकतो मा. पालकमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने प्रत्येक रुग्णालयाला 100 ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे ठरविले आहे 25 ऑक्सिजन सिलेंडर ची पहिली खेप माजी महिला संघटिका तथा माजी बांधकाम सभापती छायाताई कुंभारे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय धानोरा ला देण्यात आले या प्रसंगी उपस्थिती नंदुभाऊ कुमरे विधानसभा संघटक शकुन ताई नंदनवार डॉ देवेन्द्र सावसकडे डॉ. संतोष खोब्रागडे डॉ शीतल टेंभुरने श्री जंगावार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उज्वला बिडवाईकर सुरक्षा रक्षक अशोक कांबळे उपस्थित होते.