खाकीतील जातीयवादी डी वाय एस पी खिरडकरसह तीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

51

सतिश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी

जालना:- अँट्राँसिटीच्या गुन्हात मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती दोन लाखांची लाच स्वीकारताना आरोपावरून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डी वाय एस पी सुधीर खिरडकर यांच्यासह अन्य दोन पोलिस कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले.

तक्रार दारावर अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे व विठ्ठल पुंजाराम खार्डै यांनी पाच लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडी अंती हे काम तिन लाख रुपयांना ठरले होते. त्यातली दोन लाखांची लाच कर्मचारी संतोष अंभोरे याने खिरडकर यांच्या नावे स्विकारली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे पथकाने सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी तिघा जणाविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक वर्षारानी पाटिल, पोलिस निरीक्षक सुनील श्रीसागर, पोलिस कर्मचारी नवनाथ वाळके, किरण चिमटे, दिनेश माने यांनी केली