शहरी व ग्रामीण भागातील लसीकरणाच्या वेग वाढवा डाॅ. उमेश वावरेची मागणी.

15

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघात:- आज देशात आणि राज्यात कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रात रुग्णालयाची आणि रुग्णाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चाली आहे. मेडिकल सुविधाच्या मोठ्या प्रमाणात अभाव असून ऑक्सिजन, वेलेंटीलेटर, बेडची मोठी कमतरता आहे. तज्ञांनी तिसरी लाट येण्याची माहिती दिल्याने अनेक लोकांचा मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज युरोपियन देश सपूर्ण लसीकरण झाल्यामुळे हे देश कोरोणा मुक्त होण्याचा मार्गावर आहे.

परंतु महाराष्ट्र मधे लसीकरण वेग मंदावला मुळे आज ही आपण कोरोना वायरसचा छायत जगत आहो. म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व कामे बंद करून त्या पैशाने लस खरेदी करून. प्रत्येक खेडे गावात व शहरी वार्ड मध्ये एक मोहीम राबहून कोविड 19 खातमा केला पाहीजे.

वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, जिवनभाऊ उरकुडे, मायासिग टाक, चारू आटे, विनोद गोडघाङे उपस्थित होते.