आज ठाण्यातुन मुंबईत जाण्यासाठी मार्ग बंद.

47

आज ठाण्यातुन मुंबईत जाण्यासाठी मार्ग बंद.

आज ठाण्यातुन मुंबईत जाण्यासाठी मार्ग बंद.
आज ठाण्यातुन मुंबईत जाण्यासाठी मार्ग बंद.

अभिजीत सकपाळ, प्रतिनिधी✒
ठाणे, 22 मे:- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शनिवारी रात्री 7 तास ठाणे ते मुंबई दरम्यान वाहतूक बंद असणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामामुळे मार्ग बंद असणार आहे. ज्ञानसाधना ते कोपरी दरम्यान पादचारी पूल काढण्यात येणार असून त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलिसांनी दिले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पाडकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. त्यामुळे आज शनिवारी शनिवारी रात्री 11 ते रविवार सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई-ठाण्यादरम्यानती वाहतूक बंद राहणार आहे. तुम्हाला जर काही अत्यावश्यक कारणास्तव प्रवास करायचा असेल तर पर्यायी मार्गाचा वापर तुम्ही करू शकता.