दलित मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण, पाणीच्या जागी पोलिसांनी पाजले मूत्र.

✒क्राईम रिपोर्टर✒
कर्नाटक,दि.23 मे:- आज भारात देश 21 व्या शतकात पण जातीवादी मानशिकतेतून बाहेर यायला तयार नाही. असे अनेक घटना वरुन समोर येत आहे. कर्नाटक राज्यातील चिकमंगलूर येथील एक मानुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे दलित अत्याचार देशात मोठ्या प्रमाणात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
एका दलित मुलाला पोलीस स्थानकात हातपाय बांधून बेदम मारुन त्याचे मूत्र प्यायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणाने पोलीस उपनिरीक्षकाविरोधात पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे.
कर्नाटकातील चिकमंगलून येथे पुनीत नावाचा तरुण एका महिलेसोबत बोलत असल्याचे गावातील काही जातीवादी लोकांना हे खटकत होते. त्यांनी त्याबाबत पोलिसांना तोंडी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी पुनीत त्याच्यावर खोटे आरोप करत पुनीत या दलित तरुणाला अटक केली. त्यानंतर 10 मे रोजी या दलित तरुणाला चीकमंगलूरच्या गोनीबिडू पोलीस स्थानकात त्याचे हातपाय बांधून पोलिसांनी बेदम मारले. त्यानंतर अर्धमेल्या झालेल्या त्या तरुणाने तहान लागलीय म्हणून पाणी मागितले. मात्र पोलीस उपनिरीक्षकाने एका दुसऱ्या पोलिसाला बोलावून त्याच्यावर लघवी करायला सांगितली. त्यानंतर सुटका करायची असल्यास खाली सांडलेले मूत्र प्यायला भाग पाडले. त्यानंतर त्याला सोडले.
याप्रकरणी दलित पुनीत पीडित तरुणाने डीजीपी प्रविण सूद आणि मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून या घटनेबाबत न्याय मागितला आहे. तसेच त्या पोलीस उपनिरीक्षकाची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली असून कर्नाटक पोलिसांनी शनिवारी याप्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे.