वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 459 कोरोनामुक्त, 215 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू.
वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 459 कोरोनामुक्त, 215 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू.

वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 459 कोरोनामुक्त, 215 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू.

आतापर्यंत 41,654 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 3855.

वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 459 कोरोनामुक्त, 215 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू.
वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 459 कोरोनामुक्त, 215 पॉझिटिव्ह तर 06 मृत्यू.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा, दि.23 मे :- वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 459 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 215 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 06 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 46 हजार 729 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 654 झाली आहे. सध्या 3 हजार 855 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 47 हजार 142 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 96 हजार 880 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

वर्धा जिल्ह्यात आज मृत झालेल्यामध्ये 31 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिलाचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 1225 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाला आहे.

वर्धा जिल्ह्यात आज कोरोना बाधीत आलेल्या 215 रुग्णांमध्ये वर्धा तालुक्यातील 84, हिंगणघाट तालुका 34, आर्वी 11, आष्टी 11, कारंजा 09, देवळी 31, सेलु 13, समुद्रपुर 11 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here