Home latest News पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

132

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर दि. 27 मे:- राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी, सकाळी 8:00 वाजता कमलाई निवास,रामदासपेठ,नागपूर येथून सिंदेवाही जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत सिंदेवाहीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतुन प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे श्रवण लॉन सिंदेवाही येथे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10:20 वाजता श्रवण लॉन, सिंदेवाही येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 1:00 ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1:30 वाजता सिंदेवाही येथून सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:00 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व नगर पंचायत सावलीस पालकमंत्री यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2:30 वाजता सावली येथून व्याहाड खुर्द कडे प्रयाण करतील. दुपारी 2:45 वाजता व्याहाड खुर्द येथे आगमन व पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, व्याहाड खुर्द येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

सायंकाळी 4:30 निलसनी पेठगाव ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5:00 वाजता जाम बु.ता.सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट देतील. सायंकाळी 5:30 वाजता जाम बु.ता.सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता शासकीय विश्रामगृह रानफुल निवास गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि. 29 मे 2021 रोजी, सकाळी 10:00 वाजता आरमोरी वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.